• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. madhuri dixit and 90s popular actress meenakshi sheshadri comparison once actress talks about competition between them nsp

माधुरी दीक्षितबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत लोकप्रिय अभिनेत्री म्हणालेली, “मी कधीच तिच्यासारखी…”

Madhuri Dixit’s comparison with 90s actress: बॉलीवूडच्या धकधक गर्लची ‘या’ अभिनेत्रीबरोबर व्हायची तुलना

August 30, 2025 12:09 IST
Follow Us
  • माधुरी दीक्षित ही बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीला करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित)
    1/9

    माधुरी दीक्षित ही बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाते. अभिनेत्रीला करिअरच्या सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित)

  • 2/9

    परंतु, ‘राम लखन’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘त्रिदेव’, ‘महासंगम’, ‘किशन कन्हैया’, ‘जमाई राजा’, ‘देवदास’, ‘हम आपके है कौन’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘मृत्युदंड’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित)

  • 3/9

    विशेष म्हणजे अभिनयच नाही, तर तिचे नृत्य आणि सौंदर्याचीदेखील चाहत्यांवर भुरळ पडली होती. आज इतक्या वर्षांनंतरही अभिनेत्रीची लोकप्रियता तशीच टिकून आहे. आजही तिला प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळते. अभिनेत्री चित्रपट, रिअॅलिटी शो, तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित)

  • 4/9

    पण, तुम्हाला माहीत आहे का, एक काळ असा होता, जेव्हा माधुरी दीक्षित व लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री या दोन्ही अभिनेत्रींची मोठ्या प्रमाणात तुलना होत होती. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)

  • 5/9

    मीनाक्षी शेषाद्रीनेदेखील ‘दामिनी’, ‘हीरो’, ‘मेरी मांग’ अशा गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर या दिग्गज अभिनेत्यांबरोबर तिने काम केले. बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री म्हणून मीनाक्षीची ओळख आहे. त्यामुळे त्या काळात माधुरी दीक्षित व मीनाक्षी शेषाद्री यांची तुलना केली जात होती. (फोटो सौजन्य: मिनाक्षी शेषाद्री इन्स्टाग्राम)

  • 6/9

    या दोन्ही अभिनेत्रींनी १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्वाती’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. क्रांती कुमार यांनी हा रोमँटिक चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटात मीनाक्षी शेषाद्रीने प्रमुख भूमिका साकारली होती; तर माधुरी दीक्षितने मीनाक्षीच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारली होती. (फोटो सौजन्य: मिनाक्षी शेषाद्री इन्स्टाग्राम)

  • 7/9

    एकदा ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मीनाक्षी शेषाद्रीने माधुरी दीक्षितबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत वक्तव्य केले होते. अभिनेत्री म्हणालेली, “मी कधीच माधुरीसारखी होऊ शकत नाही. माधुरीसुद्धा माझ्यासारखी असूच शकत नाही. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही.” (फोटो सौजन्य: मिनाक्षी शेषाद्री इन्स्टाग्राम)

  • 8/9

    मीनाक्षी शेषाद्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. (फोटो सौजन्य: मिनाक्षी शेषाद्री इन्स्टाग्राम)

  • 9/9

    माधुरी दीक्षित २०२४ मध्ये ‘भुल भुलैय्या ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमाधुरी दीक्षितMadhuri Dixit

Web Title: Madhuri dixit and 90s popular actress meenakshi sheshadri comparison once actress talks about competition between them nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.