-
‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. नुकत्याच झालेल्या भागात त्रिशाचं नाव झळकलं.
-
अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय शोमध्ये सहा वर्षांच्या त्रिशासंबंधित २५ लाख रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला.
-
रचित उप्पल यांना शोमध्ये ‘२०२५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनली?’ हा प्रश्न विचारला गेला.
-
रचित यांना प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत नसल्यानं त्यांनी ‘प्रेक्षक पोल’ (Audience Poll) या लाईफलाईनचा वापर केला.
-
Audience Poll या लाईफलाइनमध्ये रचित यांना प्रेक्षकांनी मदत करत ‘A – त्रिशा ठोसर’ हा उत्तराचा योग्य पर्याय सुचवला.
-
वयाच्या सहाव्या वर्षी त्रिशा ठोसरनं राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ-२’साठी त्याला हा पुरस्कार मिळाला.
-
या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्रिशानं शाहरुख खानसह अनेक बॉलीवूड कलाकारांबरोबर फोटो काढले. (सर्व फोटो : त्रिशा ठोसर/इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी त्रिशाची मुख्य भूमिका असलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज