-
‘मुरांबा’ या मालिकेत रमा हे गोड आणि मनमिळावू पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिचा नवाकोरा लूक सध्या चर्चेत आहे.
-
या फोटोमध्ये शिवानीने परिधान केलेला फिकट गुलाबी रंगाचा घागरा-चोळीचा पेहराव तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
झळाळत्या नेटच्या दुपट्ट्याने सजलेला हा पारंपरिक लूक राजेशाही आणि सोज्वळ भासतो.
-
घागऱ्यावरील सोनसळी जरीकाम आणि सूक्ष्म डिझाईन तिच्या पोशाखाला अधिक उठाव देतात.
-
तिने परिधान केलेले सोन्याचे दागिने गळ्यातील नेकलेस, झुमके आणि कडे तिच्या लूकला पारंपरिक आकर्षण देतात.
-
शिवानीचं स्मितहास्य आणि आत्मविश्वासपूर्ण पोझ या छायाचित्राला अप्रतिम भाव देतात.
-
तिचा सटल मेकअप आणि केसाचा बांधलेला अंबाडा तिच्या सौंदर्यात साधेपणाची झळाळी आणतात.
-
पार्श्वभूमीतील राजवाड्यासारखा दृश्यपट आणि तिचा देखणा पोशाख यांचा सुंदर मेळ या फोटोशूटला सिनेमॅटिक टच देतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार