-

मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अभिनेता रोहित मानेचं हे स्वप्न काही महिन्यांपूर्वीच साकार झालं. अभिनेत्याने त्याच्या सुंदर घराची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
“साताऱ्यातील एका खेडेगावातून मी मुंबईत आलो होतो. त्यामुळे या शहरात हक्काचं घर असावं हे माझं स्वप्न होतं… फायनली मी आणि श्रद्धाने हे सुंदर घर घेतलं.” अशा भावना रोहित माने याने व्यक्त केल्या आहेत.
-
साताऱ्याहून मुंबईत आल्यावर रोहित अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहिला होता. अभिनेत्याने त्याचं नवीन घर खूपच सुंदररित्या सजवल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
-
व्हाइट अन् निळ्या रंगाची थीम वापरुन रोहितने त्याचं संपूर्ण घर सजवलं आहे. अभिनेत्याच्या घराचं प्रवेशद्वार लक्षवेधी ठरतं.
-
व्हाइट-ब्लू थीममुळे रोहितच्या घराला एकदम स्टायलिश लूक मिळाला आहे. अभिनेत्याच्या घरातील हॉल देखील एकदम प्रशस्त आहे.
-
अभिनेत्याच्या नव्या घरातील किचन एरिया सुद्धा खूपच प्रशस्त आहे.
-
रोहितच्या नव्या घरातील एका भिंतीवर त्याचे पत्नीबरोबरचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.
-
अभिनेत्याच्या नव्या घराच्या बाल्कनीतून खूपच सुंदर व्ह्यू दिसतो.
-
नव्या घराच्या दारावर अभिनेत्याने खूपच आकर्षक नेमप्लेट लावली आहे.
-
सर्व फोटो सौजन्य : रोहित माने इन्स्टाग्राम
Video by – @pineapple_studios10 @prachi_moreeeee
Designed by – @ elements_5_design_studio @ guru.pednekar, artistic.manwaa
“साताऱ्याहून मुंबईत आल्यावर…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं नवीन घर पाहिलंत का? दारावरची नेमप्लेट आहे खूपच खास
प्रशस्त हॉल, बाल्कनी अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं नवीन घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor rohit mane new home name plate grabs attention sva 00