-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेने आपला ५० वा वाढदिवस आणि कलेच्या क्षेत्रातील २५ वर्षांचा प्रवास एकत्र साजरा करत संस्मरणीय क्षण अनुभवले.
-
या खास सोहळ्याला त्याचे कुटुंबीय, निर्माते, दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार तसेच पडद्यामागील कलाकार उपस्थित होते.
-
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, जेष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांसारख्या मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
सुबोध भावेने चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचे विशेष आभार मानले. सर्व शुभेच्छा मनापासून पोहोचल्या असल्या तरी वैयक्तिक प्रतिसाद देणे शक्य नसल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले.
-
वाढदिवसाच्या निमित्ताने सुबोध भावेने सामाजिक बांधिलकीची नवी दिशा दाखवली. पुढील २५ महिन्यांसाठी तो दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला आर्थिक मदत देणार आहे.
-
या मदतीचा पहिला टप्पा सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत पूर्ण झाला. संस्थेचे प्रतिनिधी नागरगोजे सर यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
-
सुबोध भावेने सांगितले की, ‘शांतीवन’ संस्थेला दिलेली देणगी आयकर कायदा 80G अंतर्गत करमुक्त आहे आणि त्यासाठी पावती देण्यात येणार आहे.
-
या उपक्रमाची सुरुवात बीड जिल्ह्यातील ‘शांतीवन’ या अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला पहिला धनादेश देऊन करण्यात आली.
-
“समाजाने दिलेलं प्रेम परत देण्याची ही माझी छोटीशी सुरुवात आहे,” असे म्हणत सुबोधने आपल्या चाहत्यांनादेखील सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुबोध भावे/इन्स्टाग्राम)
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी