-
धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लीजेंडरी अभिनेता आहेत. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘धरम वीर’ आणि ‘चुपके चुपके’सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे आणि हिंदी सिनेमाच्या सुनहऱ्या काळाशी त्यांचं नाव जोडलं गेलं आहे.
-
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांची दोन मुले सनी देओल आणि बॉबी देओल प्रसिद्ध आहेत, पण त्यांच्या दोन मुली अजेता आणि विजेता मीडिया आणि फॅमिली लाइफपासून दूर राहतात.
-
अजेता देओल ही धर्मेंद्रची मोठी मुलगी आहे. अजेता नेहमी लो-प्रोफाइल जीवन पसंत करते आणि त्यांनी चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवले आहे.
-
अजेता अमेरिकेत शिक्षण क्षेत्रात करियर करत आहे आणि एका शाळेमध्ये मनोविज्ञान (Psychology) शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
-
अजेता देओलचे लग्न किरण चौधरी नामक इंडियन-अमेरिकन डेंटिस्टशी झाले आहे. या कपलला दोन मुली आहेत, निकिता चौधरी आणि प्रियांका चौधरी.
-
विजेता देओल, धर्मेंद्रची दुसरी मुलगी, हीही मीडिया आणि चित्रपटापासून दूर राहते. विजेताचे लग्न दिल्लीतील बिझनेसमन विवेक गिलशी झाले असून ते दिल्लीमध्ये राहत आहेत.
-
विजेता देओल राजकमल होल्डिंग्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डायरेक्टर आहेत. तसेच धर्मेंद्र यांनी त्यांच्या नावावर विजेता प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केली आहे.
-
अजेता आणि विजेता दोघीही आपल्या आई प्रकाश कौरसारख्या साध्या आणि शांत जीवनशैलीत राहतात आणि मीडियापासून दूर राहणे पसंत करतात.
-
धर्मेंद्रने १९ व्या वर्षी प्रकाश कौरशी लग्न केले आणि त्यांना चार मुले झाली सनी, बॉबी, अजेता आणि विजेता. नंतर धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनीशी लग्न केले आणि त्यांना दोन मुली ईशा आणि अहाना देओल झाल्या.
-
ईशा देओलने ‘धूम’, ‘क्या दिल ने कहा’ आणि ‘नो एंट्री’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले, तर अहाना देओल काही काळासाठी चित्रपटसृष्टीत होती, पण नंतर तिनी फिल्मी जगापासून अंतर ठेवले.
-
देओल कुटुंबाची नवीन पिढीही बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सनी देओलचा मुलगा करण देओलने ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातून डेब्यू केला आहे आणि अलीकडेच त्याने द्रीशा आचार्यसोबत लग्न केले, जी प्रसिद्ध फिल्ममेकर बिमल रॉयची नात आहे.
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी