-
वाळवंटातील शांत, सुवर्ण वाळूच्या टेकड्यांमध्ये वनिता खरातने केलेले फोटोशूट सध्या विशेष चर्चेत आहे.
-
संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात टिपलेले हे क्षण तिच्या ग्रेसफुल पोजेसमुळे अधिकच देखणे भासतात. खुल्या आकाशाखालील हा लूक फोटोंना स्वप्नवत स्पर्श देतो.
-
लांबसडक लाल उडणाऱ्या घेरदार गाऊनची झुळूक आणि वाऱ्याच्या दिशेनुसार बदलणारी हालचाल संपूर्ण फ्रेम आकर्षक बनवते.
-
या फोटोंवर ‘रेगिस्तान में फूल खिला है..’ अशी कमेंट करून तिचे कौतुक केले गेले आहे.
-
अभिनेत्रीचा आत्मविश्वास, स्मित व नैसर्गिक पोजिंग यामुळे या फोटोशूटला स्टायलिश, तसेच भावनात्मक स्पर्श मिळतो.
-
पांढऱ्या स्नीकर्ससोबत घेतलेला हा आधुनिक लूक पारंपरिक फोटोशूटच्या चौकटीपलीकडे जाऊन नव्या प्रकारची फॅशन स्टेटमेंट मांडतो.
-
‘चल वो चौबारे ढूंढें, जिनमें चाहत की बूँदें सच कर दे सपनों को सभी’ या तिच्या कॅप्शनला हे फोटो अगदी पुरेपूर न्याय देतात, असे दिसते.
-
वाळूच्या समुद्रात उभ्या असलेल्या तिच्या प्रत्येक फ्रेममध्ये प्रवास, स्वातंत्र्य आणि स्वतःशी केलेली निःशब्द गाठ यांचा अनोखा भाव दडल्याचे जाणवते.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)
अंघोळीच्या साबणाचे उरलेले तुकडे फेकू नका, ‘असा’ करा वापर, घर-कपाट होईल सुगंधी