-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेने महाराष्ट्रातील घराघरांत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.
-
या मालिकेतील ‘ईशा’ हे पात्र साकारणारी मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरेने (Apurva Gore) नुकतेच मुंबईत एका हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अपूर्वाने ‘ईशा’ ही अरुंधतीची धाकटी मुलगी आणि देशमुख कुटुंबातील सर्वांची लाडकी भूमिका साकारली, ज्यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश को-ऑर्ड सेट (White Co-ord Set) परिधान केला आहे.
-
अपूर्वाच्या या फोटोशूटवर तिची सह-अभिनेत्री मधुराणी गोखले (अरुंधती) हिने ‘Loved It’ अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
या हटके लूकमुळे अपूर्वा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अपूर्वाने सोनी वाहिनीवरील ‘ती फुलराणी’ (Ti Phulrani TV Serial) या मराठी मालिकेत देखील काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
नर्मदा क्रूझ अपघात: कौटुंबिक सहलीतील आनंदाचे क्षण शोकांतिकेपर्यंत कसे पोहोचले? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले दुर्घटनेचे संभाव्य कारण