-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.
-
या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) ‘कावेरी’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
गिरीजाने नुकतेच एका खास मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने पिवळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.
-
पिवळ्या नऊवारी साडीवर गिरीजाने लाल रंगाचा भरजरी, नक्षीदार ब्लाऊज परिधान केला आहे.
-
नऊवारी साडीतील या लूकवर गिरीजाने अत्यंत सुंदर व अनुरूप मेकअपसह आकर्षक हेअरस्टाईल केली आहे.
-
गिरीजाने या फोटोशूटला ‘Nauvari Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
