-
‘सैराट’ फेम मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिने नुकतेच लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलबरोबर (Ashish Patil) एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
‘लावणीकिंग’ म्हणून ओळखला जाणारा आशिष हा एक लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
या दोघांनी ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर डान्सही केला आहे.
-
रिंकूने या फोटोंना ‘बस गया है कोई इस दिल में… कहें या ना कहें…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रिंकू आणि आशिषच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
रिंकू लवकरच ‘आशा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाई अडलीये म्हणून ती नडलीये!’ ही या चित्रपटाची लक्षवेधक टॅगलाईन आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…