-
मराठीसह हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव.
-
विनोदी भूमिकांसह गंभीर आणि खलनायक असलेल्या भूमिका साकारत सिद्धार्थनं अनेक प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत.
-
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा ‘आपला सिद्धू’ सोशल मीडियावरदेखील तितकाच सक्रीय असतो.
-
सोशल मीडियावर सिद्धार्थ बराच सक्रीय असतो. विविध लूक्समधील फोटो-व्हिडीओ शेयर करताना दिसतो
-
अशातच सिद्धार्थनं त्याच्या सोशल मीडियावर गावचे खास फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होत आहेत.
-
सिद्धार्थ त्याच्या कोकणातल्या गावी गेला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील केळवली हे त्याचं गाव आहे.
-
नुकतीच सिद्धार्थने गावाला भेट दिली असून, तिथल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यानं गावच्या शाळेलाही भेट दिली.
-
शाळेचा आणि निसर्गरम्य परिसराचा फोटो शेअर करत त्यानं ‘माझं गाव’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
दरम्यान, ग्लॅमरच्या जगात वावरतानाही साधेपण जपणाऱ्या सिद्धार्थचं सोशल मीडियासह सर्वत्र कौतुक होत आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…