-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत प्रिया ही खलनायिकेची भूमिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने मुंबईत नवीन घर घेतलं.
-
प्रियांका तेंडोलकरने काही दिवसांपूर्वीच तिच्या नव्या घराची पहिली झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.
-
अभिनेत्रीचं हे नवीन घर २९ मजल्यावर आहे. प्रियांकाने तिचं नवीन घर अत्यंत सुंदर पद्धतीने सजवलं आहे.
-
प्रियांकाच्या नव्या घराची नेमप्लेट खूपच सुंदर आहे. या नेमप्लेटवर सगळ्यात वर तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक आहे. यानंतर दिपक प्रियांका ज्योती तेंडोलकर असं नाव लिहिण्यात आलं आहे.
-
अभिनेत्रीच्या नव्या घराच्या नेमप्लेटवर चाफ्याच्या फुलाची डिझाइन करण्यात आली आहे. ही नेमप्लेट प्रियांकाने लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधीची बहीण क्षितिजाकडून बनवून घेतली आहे.
-
प्रियांका तेंडोलकर नवीन घराबद्दल म्हणते, “हे घर माझ्या आई-बाबांचं आणि माझं आहे. आम्ही तिघांनी मिळून हे घर घेतलंय.”
-
अभिनेत्री पुढे सांगते, “माझा जन्म चाळीत झाला होता, त्यानंतर मग आम्ही 1RK मध्ये राहायला गेलो. मध्यंतरी काही वर्षे 1BHK मध्ये राहिलो. मग, आता माझ्या आई-बाबांचं स्वप्न होतं की 2BHK घर घ्यायला पाहिजे. गजानन महाराजांच्या आणि स्वामींच्या कृपेने हे शक्य झालं आणि आमचं नवीन घर झालं.”
-
प्रियांकाच्या चाहत्यांनी तिच्या नव्या घराच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
प्रियांका तेंडोलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आजवर तिने ‘साथ दे तू मला’, ‘फुलपाखरू’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मात्र, ‘ठरलं तर मग’मुळे तिला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. खलनायिकेचं पात्र असलं तरीही प्रिया या पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. ( सर्व फोटो सौजन्य : प्रियांका तेंडोलकर इन्स्टाग्राम )
Iran Three Conditions To End War: इराण युद्ध थांबविण्यास तयार; इस्त्रायल-अमेरिकेसमोर राष्ट्राध्यक्ष मसूद यांनी ठेवल्या ‘तीन’ अटी