-
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील लाडकी जोडी, अभिनेत्री अमृता बने (Amruta Bane) आणि अभिनेता शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote) सध्या गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
गोवा म्हणजे समुद्रकिनारे, निळाशार अथांग सागर आणि ऐतिहासिक चर्च यांचा सुंदर संगम.
-
या जोडप्याने आपल्या गोवा-ट्रिपचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, ते चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झाले आहेत.
-
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अमृताने गुलाबी रंगाचा स्कर्ट-टॉप परिधान केला आहे.
-
गोव्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर तिने दिलेल्या खास पोज लक्ष वेधून घेत आहेत.
-
एप्रिल २०२४ मध्ये शुभंकर आणि अमृता यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला होता.
-
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, शुभंकर सध्या ‘का रुसली रखुमाई?’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
अमृताने ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘कन्यादान’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून आपला ठसा उमटवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)
व्हाईट हाऊसबाहेरील गोळीबाळानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले मोठे पाऊल; १९ देशांच्या नागरिकांना दिलेल्या ग्रीन कार्डचा आढावा घेणार