-
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत झळकणारी प्राप्ती रेडकर पुन्हा एकदा आपल्या मोहक पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
अलीकडेच तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राप्तीने परिधान केलेला गुलाबी आणि पिवळा सिल्क लेहेंगा-साडीचा ड्रेस अगदी आकर्षक दिसत होता.
-
या पोशाखातील रंगसंगती, बारिक काम आणि पारंपरिक टेक्स्चरने तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच उठाव दिला आहे.
-
तिचा हा ड्रेस खास तिच्या आईने ज्योती रेडकर यांनी स्वतः डिझाईन आणि शिवलेला आहे, हे तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
-
लूकला परिपूर्णता देण्यासाठी प्राप्तीने गोल्डन बॉर्डर असलेला पदर ड्रेपिंग स्टाईल निवडली होती, ज्यामुळे तिचा ग्रेसफुल अंदाज उठून दिसत होता.
-
तिने घातलेली हलकी पण उठावदार सोन्याची ज्वेलरीचोकर नेकलेस, कानातले आणि पारंपरिक बांगड्यांनी तिच्या लूकची शोभा अधिक वाढवली.
-
ओपन हेअरस्टाईल, साधं मेकअप आणि स्मितहास्य यामुळे प्राप्तीचा हा अंदाज अधिकच नैसर्गिक आणि सुंदर वाटत होता.
-
प्राप्तीने हातात धरलेली छोटी एम्ब्रॉयडरी बॅग तिच्या पूर्ण स्टायलिंगशी जुळत असल्याने एक परफेक्ट ट्रेडिशनल कॉम्बिनेशन तयार झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
थंडीत ‘या’ ३ भाज्या झपाट्याने वाढवतात युरिक ॲसिड; मुतखडा, गुडघेदुखी आणि संधिवात बळावण्याआधीच व्हा सावध!