-
बॉलीवूडमधील कायम चर्चेत राहणाऱ्या कपलपैकी एक कपल म्हणजे, शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि नवरा तिचा अभिनेता झहीर इक्बाल.
-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी गेल्या वर्षी अचानक लग्नाची घोषणा केली. दोघांच्या आंतरधर्मीय विवाहामुळे काहींनी त्यांच्यावर टीका केली.
-
नेटकऱ्यांनी सोनाक्षीच्या धर्मांतराचासुद्धा उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं आहे. पण सोनाक्षी-झहीर यांनी या ट्रोलिंगकडे कायमच दुर्लक्ष केलं. या टीका त्यांनी सकारात्मकपणे हाताळल्या.
-
अशातच काही दिवसांपूर्वी एका व्लॉग व्हिडीओमध्ये झहीरनं तिच्या धर्मांतराबाबत टिप्पणी केली होती. अबुधाबीच्या व्लॉगमध्ये त्यांनी एका मस्जिदला भेट दिल्याचं पाहायला मिळालं.
-
याबद्दल सोनाक्षी व्हिडीओमध्ये म्हणालेली, “आम्ही अबुधाबीच्या प्रसिद्ध ‘शेख झायेद ग्रँड मस्जिद’मध्ये जाणार आहोत. मी पूर्वी मंदिर आणि चर्चमध्ये गेले आहे. पण मस्जिदमध्ये कधीही गेले नव्हते.”
-
यावर यावर झहीरनं लगेच एक मजेदार टिप्पणी करत म्हटलं होतं, “मी फक्त हे स्पष्ट करू इच्छितो की, मी तिला इथं धर्मांतर करण्यासाठी घेऊन जात नाहीय. आम्ही फक्त ती मस्जिद पाहायला जात आहोत, कारण ती खूप सुंदर आहे.”
-
धर्मांतराच्या मुद्द्यावर सोनाक्षीनं यापूर्वीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याबद्दल सोनाक्षी म्हणाली होती, “आम्ही कधीच आमच्यातील धर्माचा विचार केला नाही. तो माझ्यावर त्याचा धर्म लादत नाही आणि मी त्याच्यावर माझा धर्म लादत नाही.”
-
“आम्ही फक्त एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतो. आमचं लग्न स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत झालं आहे, ज्यामध्ये मी एक हिंदू स्त्री म्हणून धर्म न बदलता लग्न करू शकते आणि तो एक मुस्लीम म्हणून आपला धर्म कायम ठेऊ शकतो.”
-
दरम्यान, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी जून २०२४ मध्ये सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं. स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत मोजके कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
थंडीत ‘या’ ३ भाज्या झपाट्याने वाढवतात युरिक ॲसिड; मुतखडा, गुडघेदुखी आणि संधिवात बळावण्याआधीच व्हा सावध!