-
अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा मुलगा, निर्माता-अभिनेता सोहम बांदेकर (Soham Bandekar) लवकरच अभिनेत्री पूजा बिरारीबरोबर (Pooja Birari) विवाहबंधनात अडकणार आहे.
-
या बहुप्रतिक्षित लग्नाच्या पूर्वविधींना (Pre-Wedding Rituals) उत्साहात सुरुवात झाली आहे.
-
नुकताच बांदेकर कुटुंबाच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
-
या सोहळ्याचे काही खास फोटो सोहमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोहमची आई सुचित्रा बांदेकर यांनी ही त्यांच्या हातावर सुंदर मेहंदी काढल्याचे पाहायला मिळत आहे.
-
सोहमने मेहंदीच्या कार्यक्रमातील फोटोंना ‘मेहंदी इतरांसाठी! पार्टी माझ्यासाठी! पूजा, तयार राहा! तुला भेटण्यासाठी उत्सुक आहे..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
सध्या पूजा बिरारी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha) या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोहम बांदेकर/इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…