-
समांथा रूथ प्रभूने दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं. (फोटो- समांथा इन्स्टाग्राम)
-
राज व समांथाच्या लग्नानंतर राजच्या पहिल्या पत्नीबद्दल चर्चा रंगली आहे. (फोटो- समांथा इन्स्टाग्राम)
-
Raj Nidimoru ex wife Shhyamali De: राज निदिमोरूच्या पहिल्या पत्नीचं नाव श्यामली डे आहे.
-
श्यामली डे हिने मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर तिने चित्रपट निर्मितीत काम करण्यास सुरुवात केली.
-
श्यामली शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबत काम करू लागली.
-
श्यामली डे हिने सहाय्यक दिग्दर्शक, क्रिएटिव्ह कन्सल्टंट व पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. तिने रंग दे बसंती, ओमकारा आणि एक नादिर गोलपो चित्रपटांसाठी काम केलंय.
-
राज आणि श्यामली यांचे २०१५ मध्ये लग्न झाले. हे लग्न सात वर्षे टिकले आणि २०२२ मध्ये ते वेगळे झाले.
-
राज निदिमोरूला एक मुलगी आहे, असं म्हटलं जातं. पण काही रिपोर्ट्सनुसार राजसोबत अनेक फोटोंमध्ये असलेली मुलगी ही त्याचा सह-दिग्दर्शक डीके यांची मुलगी आहे.
-
श्यामली डे हिने राज निदिमोरूला अनेक प्रोजेक्ट्समध्ये मदत केली आहे. राजने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या एक्स पत्नीचं कौतुक केलं आहे. तिने राजला अनेक वेळा कास्टिंगमध्ये मदत केली आहे. (सर्व फोटो- श्यामली डे इन्स्टाग्राम)
“पाच हजार घेतलेत ना, गरज नसेल तर परत करा..”, गिरीश महाजनांचा शेतकऱ्यांना सल्ला