-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि उद्योगपती-पहलवान शंभूराज खुटवड यांचा पारंपरिक पद्धतीने पुण्यात दिमाखात विवाह सोहळा पार पडला.
-
प्राजक्ताने लग्नासाठी खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती, तर भरजरी दागिन्यांनी तिचा राजेशाही लूक अधिक उजळून दिसत होता.
-
लग्नातील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत आणि प्राजक्ताच्या पारंपरिक लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
या समारंभाला राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
-
रुपाली चाकणकर यांनीही खास हजेरी लावत प्राजक्ता आणि शंभूराज यांना आशीर्वाद दिला.
-
अभिनेत्री अंकिता वालावलकर ही हिरव्या साडीतील देखण्या लूकमध्ये प्राजक्ताच्या लग्नाला उपस्थित होती.
-
‘मुळशी पॅटर्न’फेम रमेश परदेशी आणि हार्दिक जोशी यांनीही नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली.
-
अशा सेलिब्रेटींच्या उपस्थितीत प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…