-
आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकर २ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकला. सोहमने लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारीसह लग्नगाठ बांधली आहे.
-
सोहम-पूजाच्या लग्नातील अनेक फोटो अन् व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजा सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय. तिच्या पात्राचं नाव आहे मंजिरी. आज आपण सोहम बांदेकरविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी देखील जाणून घेऊयात…
-
सोहम बांदेकरने ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात एन्ट्री घेतली होती. ही त्याची पहिलीच मालिका होती. ‘नवे लक्ष्य’ मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित केली जायची.
-
सोहम बांदेकर आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मनोरंजन सृष्टीत उत्तम काम करत आहे.
-
सोहम उत्तम अभिनेता आहेच पण, याचबरोबर तो ‘सोहम प्रोडक्शन’ची जबाबदारी देखील सांभाळत आहे. या अंतर्गत आजवर अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.
-
‘स्टार प्रवाह’वर सध्या सुरू असणाऱ्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन्ही आघाडीच्या मालिकांची धुरा ‘सोहम प्रोडक्शन्स’ने सांभाळली आहे. त्यांची ‘ठरलं तर मग’ मालिका तर गेली ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ही मालिका टीआरपीमध्येही अव्वलस्थानी असते.
-
‘नवे लक्ष्य’ मालिकेच्या माध्यमातून जेव्हा सोहमने कलाविश्वात एन्ट्री घेतली होती…तेव्हा त्याने घरगुती प्रोडक्शन हाऊस असूनही रितसर ऑडिशन दिली होती. यानंतरच त्याचं सिलेक्शन झालं होतं.
-
सोहमने त्याची आई सुचित्रा बांदेकर यांच्यासह ‘बाईपण भारी देवा’ या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं आहे. यामध्ये सोहम पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
-
दरम्यान, सध्या सोहम व पूजा यांच्यावर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सोहम बांदेकर इन्स्टाग्राम )
Photos: अर्जुन तेंडुलकर-सानिया चंढोकचा शाही मेहंदी सोहळा; ‘या’ दिग्गज पाहुण्यांची उपस्थिती!