-
मराठी अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेत्री सुचित्रा (Suchitra Bandekar) यांचा मुलगा सोहमने २ डिसेंबर रोजी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री पूजा बिरारीबरोबर लग्नगाठ बांधली.
-
लोणावळ्यातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये सोहम बांदेकर (Soham Bandekar) आणि पूजा बिरारी (Pooja Birari) यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
सोहम व पूजाचा हळद आणि संगीत सोहळा ही मोठ्या उत्साहात साजरा झाला होता.
-
संगीत समारंभात सोहमने फिल्मी स्टाईलमध्ये पूजाला प्रपोज केले होते.
-
सोहमच्या संगीत सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनीही शाहरुख खानच्या ‘मेरे महबूब मेरे सनम’ या गाण्यावर डान्स करत धमाल केली होती.
-
या संगीत सोहळ्यात सुचित्रा यांनी चंदेरी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता.
-
या ड्रेसमधील लूकवर सुचित्रा यांनी मोजके दागिने परिधान करत सुंदर मेकअप लूक केला होता.
-
मेकअप आर्टिस्ट श्रद्धा राणे यांनी सुचित्रा यांचा हा ‘मेकओव्हर’ करतानाचा रील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत १५ लाखांहून अधिकव्ह्यूज मिळाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोहम बांदेकर/इन्स्टाग्राम)
Sahar Shaikh : “माझ्या झेंड्याचा रंग भगवा असता तर…”, संपूर्ण मुंब्य्राला हिरवा करण्याच्या विधानावरून चर्चेत आलेल्या सहार शेख यांचं स्पष्टीकरण