-
अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) हा ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’मुळे घराघरांत पोहोचला.
-
किरण गायकवाड आणि त्याची पत्नी, लोकप्रिय अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, (Vaishnavi Kalyankar) यांचे नवीन फोटोशूट सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोशूटसाठी किरणने गडद जांभळ्या रंगाचा डिझायनर कुर्ता सेट परिधान केला आहे.
-
वैष्णवीने या फोटोशूटसाठी निळ्या रंगाची सुंदर साडी नेसून त्यावर सोन्याचे दागिने परिधान केले आहेत.
-
या लोकप्रिय जोडप्याने १४ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
-
विशेष म्हणजे, ‘देवमाणूस’ मालिकेत एकत्र काम करत असतानाच त्यांची ओळख झाली आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
-
वैष्णवी सध्या स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ (Kajalmaya TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)
होळीच्या आधीच सुरू होतील ‘या’ राशींचे अच्छे दिन! शुक्राच्या गोचरामुळे नशीब फळफळणार अन् मिळणार अमाप संपत्ती…
