-
टिव्हीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनेता समीर चौघुले.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सह प्रियदर्शिनीनं ‘फुलराणी’, ‘दशावतार’सारख्या काही मराठी सिनेमांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
प्रियदर्शिनी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते.
-
अशातच प्रियदर्शिनीने सहकलाकार समीर चौघुलेचं कौतुक करणारी खास पोस्ट शेअर केली आहे. दोघांचा एकत्र फोटो शेअर करीत तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
या पोस्टमध्ये प्रियदर्शिनी समीरबद्दल म्हणते, “अत्यंत साधा, सरळ आणि सामान्य जगण्यातला विनोद करणं ही तुझी खासियतच आहे. हीच विनोदशैली अनुभवताना दोन अडीच तास कधी संपतात लक्षातच येत नाही.”
-
यापुढे प्रियदर्शिनी म्हणते, “स्वतःवर हसल्यामुळे आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची गंमत घेतल्यामुळे आयुष्य कसं सुंदर बनतं याची आठवण करून देण्यासाठी धन्यवाद.”
-
यापुढे ती समीरचं कौतुक करीत म्हणते, “मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते की मला तुझ्या सारख्या व्यक्तीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तुझ्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो. तू एकटाच रंगमंचावर पुरुन उरतोस.”
-
दरम्यान, प्रियदर्शिनीने शेअर केलेली ही कौतुकास्पद पोस्ट समीर चोघुलेच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या कार्यक्रमासाठीची आहे. ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ हा समीर चोघुलेचा एकपात्री कथाकथनाचा कार्यक्रम आहे.
-
प्रियदर्शिनीने शेअर केलेल्या या पोस्टला अनेक कलाकार आणि चाहत्यांनी लाईक्स अणि कमेंट करत प्रतिसाद दिला आहे. तसंच कमेंटमध्येही नेटकऱ्यांनी समीरचं कौतुक केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
“मी हा पुरस्कार…”, वैभव सूर्यवंशीने सामनावीर पुरस्कार कोणाला समर्पित केला? जेतेपद पटकावल्यानंतर नेमकं काय म्हणाला?
