-
मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर (Soham Bandekar) आणि लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) यांचा विवाह सोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
-
या नवविवाहित जोडप्याचा ग्रँड रिसेप्शन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता.
-
या रिसेप्शनसाठी पूजाने चंदेरी रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता, तर सोहमने निळ्या रंगाचा स्टायलिश ब्लेझर सूट परिधान केला होता.
-
या रिसेप्शनला मराठी कलाविश्वातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
-
कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, रोहिणी हट्टंगडी, अजिंक्य देव, कविता मेढेकर, दिग्दर्शक रवी जाधव आणि केदार शिंदे अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
राजकीय नेत्यांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
-
या सोहळ्यात सिद्धिविनायक मंदिराच्या मुख्य गुरुजींच्या हस्ते बांदेकर कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यात आले.
-
या भव्य विवाह रिसेप्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोहम बांदेकर/इन्स्टाग्राम)
खोकला गेला पण घट्ट कफ फुप्फुसांना चिटकून बसलाय? ‘हे’ एक पान चावून खा; रातोरात मोकळी होईल छाती