-
कलर्स मराठी चॅनलवरच्या ‘ढोलकीच्या तालावर’ या लावणीवर आधारित रिअॅलिटी शोमधून रिचा अग्निहोत्रीला लोकप्रियता मिळाली.
-
आपल्या नृत्य कौशल्याची छाप उमटवून अवघ्या महाराष्ट्रात पोहचलेली रिचा अग्निहोत्री हिने साखरपुडा केला आहे.
-
रिचा अग्निहोत्रीने अथर्व गोडसेशी साखरपुडा केला आहे. तिने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
रिचा व अथर्वला चाहते नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
-
रिचा अग्निहोत्री मुळची ठाण्याची आहे. आई वैष्णवी अग्निहोत्री यांच्याकडून कथ्थक आणि गाण्याचे प्राथमिक धडे तिने गिरवले.
-
रिचा अग्निहोत्रीने ‘मिस ठाणे’ हा किताबही पटकावला होता.
-
तसंच ‘अमूल’च्या जाहिरातीतही ती चमकली होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोरही तिनं नृत्य सादर केलं होतं.
-
कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’च्या आधीच्या पर्वातही तिचा सहभाग होता. घाडगे अँड सूनमध्येही तिने काम केलं होतं.
-
तिचं नृत्य कौशल्य पाहून ढोलकीच्या तालावरच्या नुकत्याच झालेल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची संधी तिला मिळाली आणि त्याचं सोनं करत तिनं टॉप फाइव्हपर्यंत मजल मारली होती. (फोटो- रिचा अग्निहोत्री इन्स्टाग्राम)
मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार? भाजपातून ४३ जणांचे राजीनामे; काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…