-
बॉलीवूडचा ‘मोस्ट डिसिप्लिन’ स्टार म्हणून अक्षय कुमारला ओळखलं जातं. वयाच्या ५८ व्या वर्षी सुद्धा तो आपल्या फिटनेसकडे, दैनंदिन डाएटकडे विशेष लक्ष देतो. अभिनेता त्याच्या आरोग्याची काळजी कशी घेतो? त्याचं डाएट काय असतं? याशिवाय अभिनेता दररोज किती तास काम करतो? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात…
-
अक्षय कुमारचा दिवस पहाटे ४-४:३० वाजता सुरू होतो आणि रात्री ९:३० वाजता तो झोपतो. याशिवाय अभिनेता दिवसातील ८ तास काम करतो.
-
अक्षय याबद्दल सांगतो, “आठ तासांनंतर तुमचं शरीर थकतं. दिवसातील २४ तासांपैकी २ तास तरी व्यायाम करणं आवश्यक आहे. मी जे ८ तास सेटवर काम करतो तेव्हा मी अजिबात व्हॅनिटीमध्ये बसून राहत नाही. सतत सेटवर उपस्थित असतो.”
-
अक्षय कुमार सायंकाळी ६:३० वाजता जेवतो ( Dinner ). साडेसहाला जेवल्यावर त्यानंतर दोन-तीन तासांचा वेळ मिळतो. यादरम्यान तुम्ही शतपावली करू शकता आणि नंतर विश्रांती घेऊ शकता.
-
संध्याकाळी ६:३० वाजता जेवल्यावर जर अभिनेत्याला अचानक भूक लागली तर अक्षय कुमार यावेळेत अंडी, गाजर, मुळा, सूप किंवा सॅलड खाण्यास प्राधान्य देतो.
-
अक्षय कुमारचा सोमवारी पूर्ण दिवस उपवास असतो. याबद्दल तो सांगतो, “रविवारी रात्री जेवल्यावर मी सोमवारी काहीच खात नाही…माझा पूर्ण दिवस उपवास असतो. थेट मंगळवारी सकाळी मी पोटभर नाश्ता करतो”
-
अक्षयचे पोषणतज्ज्ञ सांगतात, “अक्षयला सात्विक पदार्थ खायला आवडतात. जेवणात मसाले नसतात, कांदा व लसूणचा सुद्धा समावेश नसतो.”
-
“रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं अशी शिकवण माझ्या घरच्यांची होती आणि हीच सवय मी आजपर्यंत फॉलो करतोय.” असं अक्षय कुमारने सांगितलं.
-
अक्षय कुमार म्हणतो, “पार्ट्यांना सगळ्यांनी जावं…मी कधीच कोणाला अडवत नाही. अगदी मी सुद्धा अनेकदा पार्ट्यांना उपस्थित राहतो. पण, एका क्षणानंतर मला घरी येऊन कधी एकदा विश्रांती घेतोय असं होतं.” त्यामुळे अभिनेता पार्ट्यांना जाणं टाळतो… अशी हटके आहे अक्षय कुमारची दिनचर्या!
Video : “ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो, विमानं पाडण्यात आली आणि..”; पृथ्वीराज चव्हाणांचं वादग्रस्त वक्तव्य