-
मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरूचा (Rinku Rajguru) ‘आशा’ (Asha Movie) हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
-
दिग्दर्शक दीपक पाटील यांचा हा चित्रपट ‘आशा’ सेविकांच्या दैनंदिन संघर्षावर आणि त्यांच्या निस्वार्थी सेवेवर प्रकाश टाकतो.
-
या चित्रपटात रिंकू ‘मालती’ नावाच्या एका आशा सेविकेची भूमिका साकारत आहे.
-
रिंकूने इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रिंकूने पिवळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर रिंकूने नथ, हार, मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या असे दागिने परिधान केले आहेत.
-
६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला तब्बल चार पुरस्कार मिळाले आहेत.
-
‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये…’ ही या चित्रपटाची टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Prithviraj Chavan: “ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव”, भाजपाच्या टीकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार