-
‘घरोघरी मातीच्या चुली’ या लोकप्रिय मालिकेत हृषिकेशची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते सुमित पुसावळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
सुमित पुसावळे यांनी पत्नी मोनिका महाजन यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, हा फोटो थेट गावच्या मळ्यातील आहे.
-
केळीच्या बागेत उभे असलेले हे दोघेही अत्यंत साध्या आणि नैसर्गिक अंदाजात दिसत असून, हा फोटो चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
या फोटोमध्ये सुमित पुसावळे कॅज्युअल टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसत असून, मोनिका महाजन साध्या प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहेत.
-
सुमित पुसावळे यांनी हा फोटो कोलगाव, महाराष्ट्र येथील केळीच्या मळ्यातून शेअर केला असून, आपल्या गावाबद्दलचा अभिमान त्यांनी ‘गाव’ या कॅप्शनमधून व्यक्त केला आहे.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेमधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली असून, हृषिकेश हे पात्र आजही घराघरात ओळखले जाते.
-
या पोस्टमधून सुमित पुसावळे आणि मोनिका महाजन यांचे साधे, गावाकडचे आणि निसर्गाशी जोडलेले आयुष्य समोर येते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुमत पुसावळे/इन्स्टाग्राम)
Donald Trump : ‘…तर २०० टक्के टॅरिफ लादणार’, डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्सला धमकी; म्हणाले, ‘मॅक्रॉन लवकरच पायउतार…’