-
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रिंकू राजगुरूचा (Rinku Rajguru) बहुचर्चित ‘आशा’ (Asha Movie) हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
-
रिंकूने आपल्या कुटुंबासह या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. यावेळी तिने शेअर केलेल्या फॅमिली फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
ग्रामीण आरोग्य दूतांची कथा दिग्दर्शक दीपक पाटील यांचा ‘आशा’ हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रातील ‘आशा’ स्वयंसेविकांच्या कष्टावर आणि त्यांच्या प्रेरणादायी संघर्षावर भाष्य करतो.
-
या चित्रपटात रिंकूने ‘मालती’ नावाच्या एका स्वाभिमानी आणि कर्तव्यदक्ष आशा सेविकेची भूमिका साकारली आहे.
-
आरोग्य सेवा दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्यासाठी मालतीला करावा लागणारा संघर्ष यात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
-
या चित्रपटाच्या प्रीमियर शोसाठी रिंकूने सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली होती. यावेळी तिने आपल्या आई-वडिलांबरोबर खास फोटोशूट केले.
-
रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांनी ‘घराला घरपण देणारी माणसं’, ‘खूप छान’, आणि ‘सुखी कुटुंब’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
या चित्रपटाचे चित्रीकरण धुळे जिल्ह्यात साखरी तालुक्यात झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Mayor Reservation List Maharashtra: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, वाचा कुठे कोणत्या गटासाठी महापौरपद राखीव