-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’मध्ये (Lakshmi Niwas TV Serial) लक्ष्मीच्या ६०व्या वाढदिवसाचा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
लक्ष्मीला वाटते की घरात कोणालाही तिचा वाढदिवस लक्षात नाही, मात्र श्रीनिवास तिला खास सरप्राईज देणार आहे.
-
‘लक्ष्मी निवास’मध्ये लक्ष्मीच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
-
त्याचवेळी जयंत फोन करून आपल्या घरी पार्टी ठेवण्याचा आग्रह धरतो, पण भावना आधीच सगळं ठरलं असल्याचं सांगते.
-
भावनाच्या घरी ‘बॉलिवूड थीम’वर भव्य सरप्राईज पार्टी आयोजित केली जाते.
-
कुटुंबातील सर्व सदस्य बॉलिवूड अवतारात या पार्टीत सहभागी होतात.
-
गाणी, नृत्य आणि धमाल सुरू होते. संपूर्ण कुटुंब एकत्र पाहून लक्ष्मी भावूक होते आणि तिला जान्हवीची आठवण येते.
-
मात्र, जान्हवी तिथेच पार्टीत उपस्थित आहे, याची लक्ष्मीला पुसटशीही कल्पना नसते.
-
आनंदाच्या या क्षणांत अचानक पोलीस पार्टीत दाखल होतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो.
-
आता पोलीस नेमके का आले आहेत? या आनंदाच्या प्रसंगी कोणते नवे संकट उभे राहणार?
-
जान्हवी सर्वांच्या नजरेस पडणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘लक्ष्मी निवास’च्या आगामी भागांत पाहायला मिळतील.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
कार्तिकी गायकवाडने गायलं ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेचं शीर्षकगीत! ३० लाखांहून अधिक Views