-
‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने कॅनडामध्ये आपला ख्रिसमस उत्साहात साजरा केला आहे.
-
या फोटोंमध्ये रसिकाने पांढऱ्या रंगाचा हाय-नेक टॉप आणि त्यावर स्टायलिश राखाडी रंगाचे फर जॅकेट परिधान करून आपला विंटर लूक पूर्ण केला आहे.
-
रसिकाने सोशल मीडियावर तिच्या या ‘कॅनडा फॅमिली’सोबतचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
-
रसिकाचा पती आदित्य बिलागी याने ख्रिसमसच्या निमित्ताने एक मजेशीर ‘पेंग्विन’ प्रिंट असलेला गडद हिरव्या आणि लाल रंगाचा स्वेटर घातला होता.
-
रसिकाने आदित्यच्या डोक्यावर सांताचे शिंग (Antlers) धरून काढलेला एक गोड फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या सेलिब्रेशनमध्ये रसिका आणि आदित्यसोबत त्यांचे कॅनडातील जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीदेखील आनंदाने सहभागी झाल्याचे दिसते.
-
ख्रिसमस ट्री, रंगीबेरंगी भेटवस्तू आणि छान सजवलेल्या घरामध्ये या जोडीचा रोमँटिक आणि कौटुंबिक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
कॅनडाच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवल्यामुळे रसिकाने या सणाला ‘व्हेरी मेरी ख्रिसमस’ असे म्हटले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील/इन्स्टाग्राम)
कंबोडियातील भगवान विष्णूची मूर्ती उध्वस्त केल्याबद्दल थायलंड सरकारचे भारताला उत्तर; मूर्ती पाडण्यामागचे कारण…