-
मराठी मनोरंजन सृष्टीची कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
श्रेयाने इजिप्तमधील प्रसिद्ध ‘ग्रँड इजिप्शियन म्युझियम’ला (GEM) भेट देऊन तेथील खास फोटो शेअर केले आहेत.
-
या सहलीसाठी श्रेयाने बेज रंगाचे ब्लेझर, काळे टॉप आणि ब्राऊन पँट असा स्टायलिश लूक परिधान केला आहे.
-
तिने आपल्या लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी डोक्यावर पांढरा प्रिंटेड स्कार्फ आणि काळा चष्मा लावला आहे.
-
फोटोंमध्ये श्रेया तिचा पती निखिल शेठसोबत इजिप्तच्या ऐतिहासिक वास्तूकलेचा आनंद घेताना दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये ती इजिप्तमधील प्राचीन आणि भव्य पुतळ्यांसमोर उभं राहून खास पोज देताना दिसत आहे.
-
म्युझियमच्या बाहेरील पिरॅमिडसारख्या डिझाइनच्या भिंतींसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेत्रीचा हा ‘ट्रॅव्हल लूक’ आणि तिचा स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
कंबोडियातील भगवान विष्णूची मूर्ती उध्वस्त केल्याबद्दल थायलंड सरकारचे भारताला उत्तर; मूर्ती पाडण्यामागचे कारण…