-
माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय खन्नाबद्दल वक्तव्य केले. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
सध्या ‘धुरंधर’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आदित्य धर चित्रपटात अक्षय खन्नाने रेहमान डकैत ही भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
अक्षय खन्नाच्या या भूमिकेचे सर्व स्तरावर कौतुक होत असल्याचे दिसत आहे. राग, आनंद, द्वेष असो वा त्याचा उत्साह अक्षयने त्याच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या डान्सचेदेखील कौतुक होत असल्याचे दिसत आहे. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
या सगळ्यात बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्नाबद्दल वक्तव्य केले आहे. माधुरी दीक्षितने सुभोजित घोष या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
-
या मुलाखतीत तिला विचारले की, सध्या धुरंधर चित्रपट चांगली कमाई करत आहे.अक्षय खन्नांचे खूप कौतुक होत आहे, लोक त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर काम केले आहे. अक्षय खन्नांसारखा कलाकार सध्या यशस्वी होताना दिसत आहे, ते पाहून तुमच्या मनात काय भावना आहेत? (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
-
या प्रश्नाचे उत्तर देताना माधुरी दीक्षित म्हणाली, “मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. तो उत्तम अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगले काम केले आहे.” (फोटो सौजन्य: द इंडियन एक्सप्रेस)
-
“मी त्याच्याबरोबर काम केले आहे, त्यावेळी तो चित्रपटसृष्टीत नवीनच होता. त्यावेळी मी स्टार होते, मी अनुभवी होते. तो चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या काही चित्रपटांपैकी एक होता. पण, नवीन असूनही तो खूप चांगले काम करत होता.” (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
“त्याची ज्या पद्धतीने प्रगती होत आहे, ते पाहताना खूप आनंद होत आहे. तो त्यावेळीही चांगले काम करत होता आणि तो आजही चांगले काम करत आहे. मी खूप आनंदी आहे”, असे म्हणत अक्षय खन्नाचे यश पाहून आनंद होत असल्याचे माधुरीने सांगितले. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
-
अक्षय खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी ‘मोहब्बत’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. १९९७ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्यांनी २००७ ला ‘आजा नचले’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. (फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “मी पुन्हा एकदा इशारा देत आहे”, कोसळत असलेल्या शेअर बाजाराबाबत ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत