-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच हर्षद आत्माराम याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
-
ज्ञानदाने नुकताच हर्षदसोबतचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात साजरा केला असून, त्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
साखरपुड्याच्या या खास प्रसंगी ज्ञानदाने पिवळ्या आणि क्रीम रंगाची अत्यंत देखणी पारंपरिक सिल्क साडी परिधान केली होती.
-
ज्ञानदाने तिच्या या लूकसाठी अस्सल मोती म्हणजेच ‘रियल पर्ल’चे खास दागिने निवडले आहेत.
-
गळ्यातील नाजूक मोत्यांचा हार, कानातील कुड्या आणि साखळी असलेली वेल तिच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत होते.
-
साखरपुड्याच्या फोटोंमध्ये ज्ञानदाच्या हातावरील मेंदी आणि हिरव्या बांगड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती तिच्या हातातील साखरपुड्याची अंगठी अतिशय आनंदाने मिरविताना दिसत आहे.
-
ज्ञानदाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सध्याच्या दिवसांत अंगठी मिरवणे ही माझी सर्वांत आवडती गोष्ट बनली आहे.”
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर /इन्स्टाग्राम)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?