-
सध्या अक्षय खन्ना त्याच्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने रहमान डकैत ही भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
धुरंधरमधील त्याचा डान्स असो वा त्याच्या विविध भावभावना, अक्षय खन्ना त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
आता या सगळ्यात करीना कपूर-खानच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या मुलाखतीत तिने अक्षय खन्नाबद्दल वक्तव्य केले होते.
-
करीना कपूरची प्रमुख भूमिका असलेला हलचल हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अक्षय खन्नादेखील प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, तिने अक्षय खन्नाबद्दल वक्तव्य केले होते.
-
ती म्हणालेली, “मला अक्षयबरोबर काम करताना मजा आली. मी अक्षयचा हिमालय पुत्र हा चित्रपट कमीत कमी २० वेळा पाहिला आहे. त्यावेळी मी शाळेत होते. त्यावेळी अक्षय लोकप्रियतेच्या शिखरावर होता. मुली त्याच्यासाठी वेड्या होत्या. त्या मुलींमध्ये मीसुद्धा होते. मी असा विचार करायचे की, अक्षय खन्ना मी बॅचलर आहे, इतका तो मला आवडत असे. मला पहिल्यापासूनच अक्षय आवडतो.”
-
ती म्हणालेली, “तो खूप क्यूट आहे. चांगला आहे. तो उत्तम व्यक्ती आहे. तो खूप चांगला अभिनेता आहे. तो हॉलीवूडमध्ये जाण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. कारण- त्याचे सादरीकरण, त्याचा अभिनय उत्तम आहे.”
-
हलचल या चित्रपटाबद्दल बोलायचे, तर हा चित्रपट प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. १९९१ ला प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक होता.
-
गॉडफादर असे मल्याळम चित्रपटाचे नाव होते. ‘हलचल’ या चित्रपटात अक्षय खन्ना, करीना कपूर यांच्याबरोबरच सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी, अमरीश पुरी, परेश रावल, अरबाज खान, शक्ती कपूर, फरहा नाज व लक्ष्मी असे कलाकार त्यात होते.
-
दरम्यान, अक्षय खन्नाचे ‘बॉर्डर’, ‘मोहब्बत’, ‘आ अब लौट चले’, ‘कुदरत’ ,’एलओसी : कारगिल’ असे चित्रपट गाजले. त्याने काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता. आता हा अभिनेता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. (फोटो सौजन्य: करीना कपूर खान इन्स्टाग्राम)
काकूंनी घातला धिंगाणा ‘सज धज के’ गाण्यावर केला नादखुळा डान्स; VIDEO होतोय तुफान व्हायरल