-
पूजा बिरारी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत काम करत आहे.
-
पूजाने ‘साजना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते.
-
२०२१ ला प्रदर्शित झालेल्या ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेत अक्षर कोठारी प्रमुख भूमिकेत होता. २०२३ पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून पूजा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील राया आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
पण, मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या पूजाचे खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झाले आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
-
वर्षभरापूर्वी पूजाने एका मुलाखतीत तिच्या शिक्षणाबद्दल वक्तव्य केले होते. ती नेमकं काय म्हणाली होती, हे जाणून घेऊ…
-
पूजा बिरारीने ‘गप्पा टप्पांची मेजवानी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिला विचारले होते की, तुझं शिक्षण काय आहे? त्यावर ती म्हणाली होती की, मी कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर केलं आहे.
-
“मी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे.”
-
याबरोबरच तिने असेही सांगितले होते की तसेच ती मूळची नाशिकमधील आसखेडा या गावची आहे. पण, सध्या तिथे कोणी राहत नाही, असेही ती म्हणाली होती.
‘धुरंदर’मधील अक्षय खन्नाच्या फेमस गाण्यावर तरुणी बेभान होऊन नाचल्या; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक