-
फरहाना भट्टला बिग बॉस १९ मुळे खूप लोकप्रियता मिळाली.
-
२९ वर्षांची फरहाना भट्ट मूळची काश्मीरची आहे.
-
फरहाना लहान असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.
-
फरहाना भट्टने तिच्या वडिलांना पाहिलेलं नाही.
-
फरहाना भट्ट पहिल्यांदाच आई-वडिलांचा घटस्फोट व आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल व्यक्त झाली आहे.
-
फरहानाने २-३ वेळा आईला दुसरं लग्न कर असं सांगितलं. पण तिच्या आईने नकार दिला.
-
पण फरहानाच्या आईने तिला सांगितलं की तिला शांततेत आयुष्य जगायचं आहे. “ज्या अंधारातून मी बाहेर पडले, तिथेच तू मला परत का ढकलू इच्छितेस?” असं तिची आई तिला म्हणाली.
-
फरहाना भट्ट म्हणाली की तिच्या आईचा घटस्फोटानंतर लग्नावर आणि कोणत्याही नात्यावर विश्वास राहिलेला नाही.
-
फरहानाने सांगितलं की तिने गेल्या १०-१२ वर्षांपासून तिच्या आईला दुसरं लग्न कर असं म्हटलेलं नाही. कारण सांगत ती म्हणाली, “मला तिच्यापासून सुटका हवीये, असं तिला वाटायला नको. मी लग्नाबद्दल बोलले, तर तिच्या मनात असे विचार येऊ शकतात.”
मुलगी मोठी झाली! प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलीच्या ‘पहिल्या पाळी’निमित्त आयोजित केला सोहळा, पाहा Photos