-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत सध्या त्याच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे.
-
वयाच्या ४७ व्या वर्षी उमेश कामतने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.
-
उमेशने त्याच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये उमेशचे सिक्स पॅक ॲब्स पाहायला मिळत आहेत.
-
उमेशने या फोटोंना “फोकस, डेडिकेशन” असं कॅप्शन दिलं आहे.
-
प्रिया व उमेश दोघंही ‘फिटनेस फ्रीक’ आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या उमेशचा हा नवा लूक सर्वत्र चर्चेत आला आहे.
-
उमेशच्या फोटोंवर चाहत्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
“फुल राडा”, “महाराष्ट्राचा शाहरुख खान”, “आमचा कॉलेजकुमार उमेश”, “टायगर अभी जिंदा है…दादा लव्ह यू”, “दर्द ए डिस्को” अशा प्रतिक्रिया या फोटोंवर आल्या आहेत.
-
सिद्धार्थ जाधव, मुक्ता बर्वे, आदिनाथ कोठारे, पूर्वा कौशिक, जितेंद्र जोशी, आरती मोरे, अनघा अतुल, सोनाली खरे या कलाकारांनी उमेशच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : tejasnerurkarr, उमेश कामत इन्स्टाग्राम )
Photos: अर्जुन तेंडुलकर-सानिया चंढोकचा शाही मेहंदी सोहळा; ‘या’ दिग्गज पाहुण्यांची उपस्थिती!