-
‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच जीवा आणि काव्याच्या नात्याविषयीचं सत्य उघड झालं. यानंतर संतप्त नंदिनी घर सोडून गेली आणि पार्थ सुद्धा काव्यावर नाराज आहे.
-
पार्थ आणि नंदिनी प्रचंड दुखावले गेल्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी आता जीवा आणि काव्याने ‘मिशन लग्नासाठी कायपण’ ही मोहीम हाती घेतली आहे.
-
जीवा तर थेट नंदिनीच्या घरी रिक्षा घेऊन राहायला गेलाय. तर इकडे चिडलेला बोका अर्थात पार्थचा राग घालवण्यासाठी काव्याने चक्क बोकाच ( टेडी बेअर ) घरी आणलाय.
-
काव्या आणि या बोक्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये काव्याचा नेहमीपेक्षा आगळावेगळा लूक पाहायला मिळत आहे. काव्याने एकदा तरी साडी नेसावी अशी पार्थची फार इच्छा असते. पण, मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे ती साडी नेसायला नकार देते. ड्रेस घालून घरात वावरत असते.
-
पण, आता पार्थवर असलेल्या प्रेमाची जाणीव काव्याला झालेली आहे. ती आता मालिकेत एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आली आहे.
-
सुंदर साडी, स्लीवलेस ब्लाउज, छोटीशी नोजपिन, मोकळे केस, टिकली, हातात सिंगल कडा या लूकमध्ये काव्या खूपच सुंदर दिसतेय.
-
काव्याने पार्थ देशमुखांना इम्प्रेस करण्यासाठी हा लूक केल्याचं बोललं जात आहे.
-
काव्या आणि जीवाच्या या प्रयत्नांना यश मिळावं आणि दुरावलेली मनं पुन्हा एकत्र यावीत याची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह वाहिनी )
“उद्धव ठाकरेंना राग आला आणि त्यांनी…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?