-
Sunny Deol Pooja Deol Love Story : देओल कुटुंबीय सातत्याने चर्चेत असतात. पण सनी देओलची पत्नी मात्र लाइमलाइटपासून दूर असते.
-
सनी देओलच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे.
-
पूजा देओल शेवटची मुलगा करण देओलच्या लग्नात दिसली होती.
-
तेव्हा पूजा देओलच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले होते. आज पूजा देओल व सनी देओलची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.
-
सनी देओल व पूजा देओलचं लग्न १९८४ साली लंडनमध्ये झालं होतं. पूजाचं खरं नाव लिंडा आहे.
-
पूजा देओलच्या वडिलांचं नाव कृष्णन देव महल व आईचं नाव सारा होतं.
-
पूजाची आई सारा महल ब्रिटिश होती, ती ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित होती.
-
सनी देओल व पूजा बालपणीचे मित्र होय. लोक पूजा देओलला गृहिणी म्हणून ओळखतात. पण ती केवळ गृहिणी नाही तर एक लेखिका देखील आहे आणि तिने बॉलिवूडमध्ये काम केले आहे.
-
तिने सनी देओलच्या ‘यमला पगला दीवाना-२’ या चित्रपटाची कथा लिहिली होती.
-
पूजाने १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर पूजाने कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही.
-
माध्यमांनुसार, लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष पूजा आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये फारशी आनंदी नव्हती. सनी देओलच्या अफेअर्सच्या चर्चा हे त्यामागे कारण होते.
-
आता या दोघांच्या लग्नाला जवळपास चार दशकं झाली असून त्यांचा मोठा मुलगा करणचं लग्नही झालं आहे. (सर्व फोटो- (फोटो – वरिंदर चावला व करण देओलच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
Lockdown in India: लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारचे महत्त्वाचे विधान; पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी काय म्हणाले?