-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या तिच्या लग्नामुळे आणि सुंदर फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
२ डिसेंबर २०२५ रोजी प्राजक्ताने पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि पैलवान शंभूराज खुटवड (Shambhuraj Khutwad) यांच्याशी विवाहगाठ बांधली.
-
लग्नानंतर प्राजक्ताने नुकतेच एक खास फोटोशूट केले असून, यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने पारंपारिक पिवळ्या रंगाची मुनिया पैठणी साडीची (Muniya Paithani Saree) निवड केली आहे.
-
पिवळ्या रंगाच्या या साडीवर प्राजक्ताने कोल्हापुरी साज, नथ आणि हिरव्या बांगड्या असा साजशृंगार (Traditional Jewellery) केला आहे.
-
झी मराठीच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ‘महाराणी येसूबाईंची’ भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या प्राजक्ताचा हा पारंपारिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
मोकळे केस आणि सुबक मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली असून सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
अवघ्या २ महिन्यांत स्टार प्रवाहची मालिका गाशा गुंडाळणार! TRP मुळे मोठा निर्णय, ‘या’ दिवशी असेल शेवटचा भाग, पाहा प्रोमो…