-
अनेक स्टारकीडने अलीकडेच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, त्यापैकीच एक नाव म्हणजे अगस्त्य नंदा.
-
अगस्त्य नंदाचे आई-वडील जरी अभिनय क्षेत्रात सक्रिय नसले, तरी त्याला अभिनयाचा मोठा वारसा आहे.
-
अगस्त्य नंदा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू आहे. बच्चन कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा या क्षेत्रात सक्रिय असून बच्चन कुटुंब बॉलीवूडमधील मोठ्या कुटुंबांपैकी एक आहे.
-
अगस्त्य हा अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चनचा मुलगा आहे. अगस्त्यच्या वडिलांचं नाव निखील नंदा असं आहे.
-
अमिताभ बच्चन यांचा नातू असल्याने त्याला बच्चन कुटुंबातून असल्याने लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, त्याचं ओझं जाणवतं का असं आय एम डीबीशी संवाद साधताना विचारण्यात आलं.
-
अगस्त्य नंदाने यावेळी अमिताभ बच्चन यांचा वारसा पुढे नेणार नाही असं म्हटलं.
-
अगस्त्य म्हणाला, “मला दडपण जाणवत नाही, कारण तो माझा वारसा नाही, असं मला वाटतं.”
-
अगस्त्य पुढे म्हणाला, “माझं आडनाव नंदा आहे. मी आधी माझ्या वडिलांचा मुलगा आहे, त्यामुळे त्यांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तो वारसा मी जाणीवपूर्वक पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे.”
-
यासह अगस्त्य नंदाचा कपूर कुटुंबीयांशीही संबंध आहे. अगस्त्यचे बाबा निखील नंदा यांच्या आई नीतू नंदा या दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या कन्या होत्या. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
४० वर्षांनंतरही कमी झालेली नजर हळूहळू होईल तीक्ष्ण, हार्ट अटॅक येणार नाही, फक्त आठवड्यातून एकदा ‘ही’ भाजी खा