-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ (Veen Doghatli Hi Tutena) सध्या रंजक वळणावर आली आहे.
-
गोव्यातील शाही विवाहसोहळ्यानंतर आता या मालिकेत सणासुदीचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
-
स्वानंदी-समर आणि अधिरा-रोहन यांची लग्नानंतरची ही पहिलीच मकरसंक्रांत (Makar Sankranti 2026) आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणात काही विघ्न येताना दिसत आहेत.
-
एकीकडे अधिरा आणि रोहनच्या नात्यातील दुरावा वाढत चालला आहे.
-
नेहमी उत्साही असणारी अधिरा आपल्या पहिल्या संक्रांतीसाठी फारशी उत्सुक दिसत नाही.
-
त्यांचे हे नाते सावरण्यासाठी समर आणि स्वानंदी पुढाकार घेतात, मात्र काकूंना ही मध्यस्थी रुचत नाहीये. दुसरीकडे, अंशुमनने रोहनचा अपघात घडवून आणण्याचा कट रचला आहे.
-
घरात पूजेची तयारी सुरू असतानाच रोहन बेपत्ता असल्याने अर्पिता अधिराला टोमणे मारू लागते. पण स्वानंदी वेळेत रोहनला घेऊन घरी पोहोचते.
-
एका मोठ्या अपघातातून रोहन सुखरूप वाचला असला तरी, पूजेच्या वेळी रोहनच्या आईने घातलेल्या गोंधळामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
-
या गोंधळामुळे आता समर-स्वानंदीच्या नात्यातही गैरसमज निर्माण होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
मादुरो यांच्याप्रमाणे पुतिन यांनाही उचलणार का? डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकाराचा प्रश्न; उत्तरात म्हणाले, “त्याची गरज…”