-
अभिनेत्री मानसी नाईकचा काळ्या रंगाच्या भरजरी पैठणीतील ‘शाही लूक’ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
संक्रांतीच्या निमित्ताने मानसीने काळी साडी आणि पारंपरिक दागिन्यांची निवड करीत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि हातात भरगच्च बांगड्या… मानसीच्या या मराठमोळ्या रूपातून सौंदर्याची खाणच ओसांडून वाहत आहे.
-
सोनेरी काठ असलेल्या या काळ्या साडीमध्ये मानसीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून, तिचा ‘नखरा’ चाहत्यांना घायाळ करीत आहे.
-
गळ्यात कोल्हापुरी साज आणि जड दागिन्यांनी मानसीने आपल्या या पारंपरिक लूकला एक परिपूर्ण ‘क्लासिक’ टच दिला आहे.
-
मानसीने तिच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, परंपरेतली मोहकता आणि आधुनिक अंदाज यांचा सुंदर मेळ या फोटोंमध्ये दिसून येतोय.
-
साडीचा पदर सावरत आणि मिश्कील हास्य करीत मानसीने दिलेल्या पोजेस सोशल मीडियाचे तापमान वाढवत आहेत.
-
मानसीच्या या पैठणी साडीची आणि त्यावरील बारीक नक्षीकामाची चर्चा आता फॅशनप्रेमींमध्ये रंगू लागली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक/इन्स्टाग्राम)
Dr Medha kulkarni : मुलांना गणपतीची आरती येत नाही…अन् मुंज, संस्कारी आणि ब्राह्मण म्हणून मिरवणारे…