-
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व शंभुराज खुटवड यांचा विवाहसोहळा २ डिसेंबर २०२५ रोजी थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
प्राजक्ताने नुकतीच लग्नानंतर तिची पहिली मकरसंक्रांत साजरी केली आहे. याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
प्राजक्ता व शंभुराज पहिली मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी भगवान शिवशंकराच्या १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते.
-
प्राजक्ताने पहिल्या मकरसंक्रांतीनिमित्त खास लूक केला होता.
-
लाल रंगाची साडी, सुंदर दागिने, हातात हिरव्या बांगड्या या लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसतेय.
-
प्राजक्ता व शंभुराज या दोघांनी जोडीने मंदिरात मनोभावे पूजा केली.
-
“पहिली मकरसंक्रांत! श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतलं. ॐ नमः शिवाय, संभाजीनगर” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
प्राजक्ताच्या चाहत्यांनी या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत या जोडप्याला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम )
हार्ट अटॅकचा धोका वाढतोय? माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितली हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ ५ तेलांची नावं; तुमच्या स्वयंपाकघरात आहेत का ही तेलं?