-
Makar Sankranti 2026: मराठी अभिनेत्री पूजा बिरारीने नुकतीच अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर (Soham Bandekar) याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
-
यंदाची मकर संक्रांत बांदेकर कुटुंबासाठी आणि विशेषतः त्यांची सून पूजासाठी (Pooja Birari) अत्यंत खास ठरली आहे.
-
लग्नानंतरची पूजाची ही पहिलीच संक्रांत असल्याने तिने सोशल मीडियावर आपले पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी पूजाने काळ्या रंगाची साडी (Black Saree Look) नेसली होती.
-
पूजाने काळ्या साडीतील लूकवर हलव्याच्या दागिन्यांचा सुंदर साज (Halwyache Dagine) केला होता.
-
पूजाने या फोटोंना ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ, पतंग आणि आनंद…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पूजा सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yed Lagal Premach TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)
वयानुसार उंची आणि वजन किती असावे? परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा