-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांनी लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत खुलताबाद येथील भद्रा मारुती मंदिरात साजरी केली.
-
या प्रसंगी प्राजक्ताने लाल रंगाची अतिशय सुंदर भरजरी साडी आणि त्याला साजेसे हलव्याचे दागिने परिधान केले होते.
-
शंभुराज खुटवड यांनी चॉकलेटी रंगाचा शर्ट आणि काळी पँट असा साधा पण रुबाबदार पेहराव करून देवाचे दर्शन घेतले.
-
प्राजक्ताने कपाळावर मोठा टिळा लावून आणि हातात पारंपारिक बांगड्या भरून आपला नववधूचा साज पूर्ण केला होता.
-
दोघांनीही हनुमानाच्या मूर्तीसमोर हात जोडून आपल्या सुखी संसारासाठी मनोभावे प्रार्थना केली.
-
मंदिराच्या वतीने या जोडप्याला नारळ आणि शाल देऊन सन्मानपूर्वक आशीर्वाद देण्यात आले.
-
“भद्रा मारुती …. येथील हनुमानाची मूर्ती निद्रावस्थेत आहे…हे स्थान नवसाला पावणारे आणि अत्यंत जागृत मानले जाते…. हे मंदिर हिंदू धर्मासाठी महत्त्वाचे असून, खुलताबादचा राजा भद्रसेन याच्याशी संबंधित आहे, म्हणून याला भद्रा मारुती म्हणतात. ” सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने भद्रा मारुती मंदिराचा इतिहास आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्वही चाहत्यांना सांगितले.
-
मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर केलेल्या या देवदर्शनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
वयानुसार उंची आणि वजन किती असावे? परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा