-
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनला ११ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. घरात एकूण १७ स्पर्धकांनी प्रवेश घेतला असून यामध्ये पहिल्या दिवसापासून छोट्या पडद्यावरच्या Cool सूनबाईंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या सदस्याचं नाव आहे तन्वी कोलते. ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यापासूनच तन्वी सर्वत्र चर्चेत आहे. ती मूळची कोकणातील आहे. विविध सौंदर्य स्पर्धांमध्येही (Beauty Pageant) ती सहभागी झाली होती. मात्र, ‘लक्ष्मी निवास’मुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.
-
तन्वीने ग्रँड प्रीमियर सोहळ्यात रितेश देशमुखसमोर मंचावरच आयुष संजीवशी वाद घातला होता. यानंतर घरात सुद्धा पहिल्यादिवसापासून तिचे अन्य सदस्यांशी वाद होत आहेत.
-
तन्वी कोलतेने बिग बॉसच्या पहिल्यात कॅप्टन्सी कार्यात सागर कारंडेच्या प्रोफेशनवर भाष्य केल्याचं देखील पाहायला मिळालं. यावर अनेक मराठी कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
आता रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर तन्वीला काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
-
तन्वीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
-
‘लक्ष्मी निवास’मध्ये सिद्धूच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच सिंचनाची भूमिका अभिनेत्री तन्वी कोलते साकारत होती. ती लक्ष्मी-श्रीनिवासची धाकटी सून देखील असते. पण, बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्यासाठी तन्वीने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
-
‘लक्ष्मी निवास’ मालिकेला रामराम करून ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये तन्वीने एन्ट्री घेतली आहे. आता शो संपल्यावर ती पुन्हा मालिकेत परतणार की, ‘लक्ष्मी निवास’मध्ये सिंचनाच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट येणार हे लवकरच स्पष्ट होईल.
-
मालिका सोडून तन्वी शोमध्ये प्रवेश करेल असा अंदाज कोणीही बांधला नव्हता. त्यामुळे तन्वी ग्रँड प्रीमियर सोहळ्यात रितेशला म्हणाली होती, “सर प्लीज माझ्या हाताला चिमटा काढा! कारण, मी शोमध्ये आलेय, तुमच्यासमोर उभी आहे यावर माझा खरंच विश्वास बसत नाहीये.” ( सर्व फोटो सौजन्य : तन्वी कोलते इन्स्टाग्राम )
फेब्रुवारीमध्ये सोन्याचे दिवस जगतील सूर्य-मंगळाच्या ‘या’ प्रिय राशी; नोकरी, व्यवसायात होईल अनेपक्षित लाभ; बघा तुम्ही आहात का भाग्यवान