-
प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माती फराह खान आपल्या हलक्याफुलक्या आणि विनोदी कुकिंग व्लॉग्ससाठी ओळखल्या जातात. या व्लॉग्समध्ये त्या विविध कलाकारांच्या घरी जाऊन गप्पा मारताना आणि घरगुती जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात.
-
यावेळी फराह खान यांनी आपल्या नव्या व्लॉगसाठी एका वेगळ्याच कलाकाराची निवड केली आहे. त्यांनी स्टँडअप विनोदकार आणि रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेल्या प्रणित मोरे याच्या घरी भेट दिली.
-
फराह खान आपल्या नेहमीच्या सहकाऱ्यासह म्हणजेच कुक दिलीप यांच्यासोबत प्रणित मोरे याच्या घरी पोहोचल्या. प्रणित याने त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले.
-
या भेटीदरम्यान प्रणितने फराह खान यांना घरचे चविष्ट जेवण वाढले. तसेच आपले घर दाखवत प्रणितने त्यांना कौटुंबिक वातावरणाची ओळख करून दिली.
-
गप्पांच्या ओघात प्रणितने आपल्या आयुष्यातील संघर्ष, सुरुवातीचे दिवस आणि कुटुंबाची साथ यांबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
-
प्रणितने सांगितले की, त्याच्या कारकिर्दीत त्याला आई-वडिलांचा कायमच भक्कम पाठिंबा मिळाला. वडील बस वाहक होते आणि सुरुवातीला मुलगा नेमके काय करतोय हे त्यांना स्पष्ट झाले नसले तरी त्यांनी त्याला ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना कधीही अडथळा आणला नाही.
-
आई टिफिन सेवा चालवत असल्याचे सांगत संपूर्ण कुटुंबाने एकत्र मेहनत घेतल्याचे त्याने सांगितले. हे ऐकून फराह खान भारावून गेल्या आणि त्यांनी प्रणित यांच्या आईचे मनापासून कौतुक केले.
-
हा व्लॉग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी प्रणित मोरे यांच्या कुटुंबाचे विशेष कौतुक केले आहे. अनेकांच्या मते, Bigg Boss 19 मधून ओळख मिळालेल्या प्रणित याची लोकप्रियता वाढली असली तरी त्याचे कुटुंब आजही साधेपणा आणि वास्तवतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रणित मोरे आणि फराह खान/इन्स्टाग्राम)
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही पैसे नाही… कुठे अर्ज करता येईल ?