-
मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
१ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, यानिमित्ताने हेमंतने अभिनेत्री कादंबरी कदमबरोबरचे (Kadambari Kadam) काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे, तब्बल १८ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसत आहे.
-
हेमंतने इन्स्टाग्रामवर कादंबरीबरोबरचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो १८ वर्षांपूर्वीचा असून दुसरा फोटो सध्याचा आहे.
-
हे फोटो शेअर करताना हेमंतने अत्यंत भावनिक कॅप्शन दिले आहे. तो म्हणतो, “अठरा वर्षांनी पुन्हा एकत्र! दोन छोटी मुलं मोठी झाली… किती काय काय घडून गेलं. कादंबरी, तुझ्यासोबत पुन्हा काम करताना खूप मजा आली. आता परत एवढं अंतर नको! प्रामाणिकपणे सांगतो, ‘क्रांतिज्योती’ मधली ‘सुमन’ तुझ्यापेक्षा उत्तम कोणीच साकारू शकलं नसतं. माझा अभिनेता, लेखक आणि आता दिग्दर्शक असा प्रवास तुझ्यासोबत अलिबागमध्येच पूर्ण झाला, याचा आनंद आहे.”
-
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट अलिबागमधील नागाव येथील ९० वर्षे जुन्या शाळेवर आधारित आहे.
-
मोडकळीस आलेल्या एका मराठी शाळेच्या जागेवर इंग्रजी माध्यमाची शाळा बांधण्याचा घाट घातला जातो.
-
शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिरके (अभिनेते सचिन खेडेकर) आपली शाळा वाचवण्यासाठी धडपड करतात. या लढ्यात शाळेचे जुने विद्यार्थी एकत्र येतात आणि मराठी माध्यमाचे महत्त्व टिकवण्यासाठी लढा देतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : हेमंत ढोमे/इन्स्टाग्राम)
Akshay Kumar : मुंबईत बेदरकार मर्सिडीजमुळे अक्षय कुमारच्या गाडीला अपघात, इनोव्हा थेट दोन चाकांवरच उभी राहिली; रिक्षाचा चक्काचूर