-
अभिनेत्री केतकी कुलकर्णी हिने निळ्या रंगाच्या साडीत आपले साजिरे रूप चाहत्यांसमोर मांडले असून, तिचे हे सौंदर्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
केतकीने आपल्या सोशल मीडियावरून पारंपरिक दागिन्यांसह एक नवा लूक शेअर केला असून, तिची ही साऊथ इंडियन स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
-
या फोटोमध्ये केतकीने निळ्या आणि गुलाबी रंगाचे सुंदर कॉम्बिनेशन परिधान केले असून, तिच्या सौंदर्याचा नवा पैलू समोर आला आहे.
-
हा पेहराव घातला की, मनात ‘परदेसिया’ गाणे वाजू लागते, अशी कॅप्शन देत केतकीने आपल्या भावना चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.
-
अस्सल भारतीय दागिन्यांनी नटलेली केतकी या फोटोमध्ये एखाद्या राजकुमारीप्रमाणे भासत असून, तिची ही साधी आणि शालीन स्टाईल सर्वांना भुरळ पाडत आहे.
-
ग्रामीण पार्श्वभूमीवर काढलेल्या या फोटोमध्ये केतकीचे सौंदर्य अधिकच खुलून आले असून, तिने पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित केले आहे.
-
केतकी कुलकर्णी हिचा हा फोटो अल्पावधीतच व्हायरल झाला असून, तिचे चाहते या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
गुलाबी रंगाच्या ब्लाऊजवर निळ्या साडीचा साज चढवून केतकीने चाहत्यांना घायाळ केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Akshay Kumar : मुंबईत बेदरकार मर्सिडीजमुळे अक्षय कुमारच्या गाडीला अपघात, इनोव्हा थेट दोन चाकांवरच उभी राहिली; रिक्षाचा चक्काचूर